शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्या घरावर गुरुवारी सकाळी छापेमारी करण्यात आली. त्यांच्या शासकीय निवासस्थानासह 7 ठिकाणी ही छापेमारी झाली आहे. त्यानंतर अनिल परब यांची तब्बल 13 तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे खोटे असून आपण केंद्रीय तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः केतकीचा तुरुंगवास वाढणार, जामीन अर्ज फेटाळला)
मी उत्तर देणार- परब
ईडीच्या अधिका-यांनी शासकीय निवासस्थानी आणि माझ्याशी संबंधित काही लोकांच्या घरांवर छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या बातम्या येत होत्या. दापोली येथे अससलेले साई रिसॉर्टचे मालक हे सदानंद कदम आहेत. तसा त्यांनी दावा देखील न्यायालयात केलेला आहे. हे रिसॉर्ट अजूनही सुरू करण्यात आलेलं नसताना, पर्यावरणाची कलमं लावून केंद्रीय पर्यावरण खात्याने दापोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. तरीसुद्धा ईडीकडून अशाप्रकारे छापेमारी करण्यात आली आहे. मला कोणीही प्रश्न विचारले तरी मी उत्तर देणार आणि केंद्रीय तपास यंत्रणांना यापुढेही सहकार्य करणार असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः SBI मध्ये मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर होण्याची संधी! परीक्षेविना मुलाखत, किती असणार पगार?)
मुंबई, पुणे, रत्नागिरीसह अनिल परब यांच्याशी संबंधित एकूण सात ठिकाणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. तसेच अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथे असलेल्या साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिका-यांकडून छापेमारी करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community