कोकणातील शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे. शनिवारीपर्यंत शिवसेना बंडखोरांवर कारवाई करण्यासाठीच्या करण्यासाठीच्या बैठकीला उपस्थित राहणारे उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चेना उधाण आले आहे.
शिंदे गटात सामील होणारे सामंत हे आठवे मंत्री
बंडानंतर शिंदे गटात सामील होणारे उदय सामंत हे आठवे मंत्री आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील एकनाथ शिंदे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, बच्चू कडू, शंभूराज देसाई यांच्यानंतर उदय सामंत हे ८ वे मंत्री आहेत. त्यामुळे सामंत यांच्या जाण्याने आता शिवसेनेमध्ये विधानसभेतून निवडून आलेले केवळ एकमेव आदित्य ठाकरे हे मंत्री शिल्लक राहिल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेत खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार सकाळीच उदय सामंत सूरतला गेले होते. त्यानंतर ते गुवाहटीला रवाना झाल्याचे सांगितले जात आहे. उदय सामंत हे गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती असून चार्टड विमानाच्या लिस्टमध्ये उदय सामंत यांचे नाव पहिल्या क्रमांकावर दिसतेय. रविवारी त्यांचा फोन नॉट रिचेबल येत होता. त्यांच्याशी कित्येकदा फोनवरून दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र कोणताही संपर्क होऊ शकला नाही. तसेच, त्यांच्या काही समर्थकांमध्ये उदय सामंत गुवाहाटीला पोहोचल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे शिवसेनेला एकच धक्का बसला असून शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेनेची चिंता वाढली
राज्यात राजकीय घडामोडी सुरू असताना मंत्री उदय सामंत शिवसेनेच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहत होते. शुक्रवारी पाली येथील निवासस्थानी उदय सामंत यांनी दिवसभर पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी आणि कुटुंबीयांशीही चर्चा केली. या चर्चेतील प्रतिसादाचा अंदाज घेऊन सामंत लवकरच भावी राजकीय दिशा ठरवतील, असे सांगितले जात होते.
Join Our WhatsApp Community