बाळासाहेबांमुळेच मोदींचे अस्तित्व आहे नाहीतर… शिवसेना आमदाराचे मोठे विधान

बाळासाहेबांमुळेच मोदी आज देशाचे पंतप्रधान झाले आहेत.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकेचे सोने लुटल्यानंतर शिवनसेना आणि भाजपात शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे जोरदार युद्ध रंगलेले आसतानाच, आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरेंमुळेच नरेंद्र मोदींचे अस्तित्व आहे नाहीतर ते केव्हाच संपले असते, अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी टीका केली आहे.

(हेही वाचाः शरद पवारांना महाराष्ट्रात पडू लागले पश्चिम बंगालचे स्वप्न!)

बाळासाहेबांच्या फोटोवर भाजपा पक्ष मोठा झाला 

नरेंद्र मोदी कोण आहेत? बाळासाहेब ठाकरे नसते तर त्यांचं अस्तित्व केव्हाच संपलं असतं. शिवसेनेचं बोट धरुनच भाजपा नेते मोठे झाले आहेत. राज्यात जेव्हा शिवसेनेशी युती झाली तेव्हा शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या फोटोवरच भाजपावाले मोठे झाले. त्यांचेच फोटो लाऊन तुम्ही तुमचा पक्ष राज्यात वाढवला, अशी बोचरी टीका जाधव यांनी केली आहे.

(हेही वाचाः आता भाजपचे ‘पदरा’आडचे राजकारण! सेनेचा घणाघात)

नाहीतर मोदी तेव्हाच घरी गेले असते

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये दंगली उसळल्या. त्यावेळी नरेंद्र मोदींना मुख्यमंत्री पदावरुन दूर करण्याचा निर्णय घेण्यासाठी लालकृष्ण अडवाणींनी बाळासाहेबांची भेट घेतली होती. त्यावेळी वाटेल ते झालं तरी चालेल पण मोदींना बदलायचे नाही, असे बाळासाहेबांनी अडवाणींना सांगितले होते. म्हणून बाळासाहेबांमुळेच मोदी आज देशाचे पंतप्रधान झाले आहेत, नाहीतर त्याच दिवशी घरी गेले असते, असंही भास्कर जाधव म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here