Shivsena : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; राहुल नार्वेकर पुढील आठवड्यापासून घेणार सुनावणी

173

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पुढील आठवड्यापासून आमदार अपात्रतेसंदर्भात प्रत्यक्ष सुनावणी घेणार आहेत. पहिल्या टप्प्यात ठाकरे गटाच्या १४ आमदारांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर अलिकडेच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील सर्व आमदारांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे.

दुसरीकडे, ठाकरे गटाच्या आमदारांनी आपले उत्तर विधानसभा अध्यक्षांकडे सादर केले आहे. त्यामुळे आधी त्यांची सुनावणी होणार आहे. दररोज एका आमदाराची बाजू ऐकून घेतली जाणार आहे, अशी माहिती विधिमंडळातील सूत्रांनी दिली.

(हेही वाचा No Confidence Motion : श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; UPA काळातील भ्रष्टाचारांची वाचून दाखवली यादी )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.