शिवसेना आमदार अपात्रतेच्या मुद्यावर (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अंतिम निर्णय देत खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आहे, असे सांगितले. १६ जानेवारी रोजी MLA Disqualification Case या प्रकरणी सुनावणी होणार आहे. मात्र ही सुनावणी आधीच्याच जुन्या याचिकेवर होणार आहे.
राहुल नार्वेकर यांच्या निर्णयानंतर प्रथमच MLA Disqualification Case या विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकर यांच्या निकालानंतर ठाकरे गटाकडून त्यांच्या निर्णयाला अजून आव्हान देण्यात आले नाही. तर सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी एकत्रित आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. त्याचसंदर्भातील याचिकेवर सुनावणी होणार आहे.
राहुल नार्वेकर यांनी कोणालाही अपात्र न करता शिवसेना हा पक्ष शिंदेंना दिला. त्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची भूमिका जाहीर करण्यात आली. पण अद्याप राहुल नार्वेकरांच्या निकालाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली नाही. त्यामुळे जर 16 जानेवारी रोजी सुनावणी झाली तर ही सुनावणी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची एकत्रित आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर होईल.
Join Our WhatsApp Community