मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी रविवार, 17 एप्रिल रोजी आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रविवारी रात्री हा प्रकार घडला असून नेहरु नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रजनी कुडाळकर यांनी रात्री 9 वाजताच्या दरम्यान आत्महत्या केल्याचे कळते. पोलिसांनी रजनी यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. हा अहवाल आल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
(हेही वाचा उरले फक्त ५ दिवस, तरी ३५ हजार एसटी कामगार गैरहजर
Join Our WhatsApp Community