शिवसेनेच्या पदाधिकारी शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावरील व्हायरल मॉर्फ व्हिडिओ प्रकरणी सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. याबाबत प्रकाश सुर्वे यांनी आपली बाजू मांडत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
( हेही वाचा : ‘यह एक चिराग कई आँधियों पे भारी है…’; देवेंद्र फडणवीसांची तुफान फटकेबाज )
आमदार प्रकाश सुर्वे यांनी यासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये आपली तब्येत ठिक नसल्याने आपण बोललो नाही असे सुर्वे यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, “मी गेल्या महिन्याच्या १८ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारीपर्यंत माझ्या प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात होतो. सध्या मला थ्रोट इंफेक्शनचा त्रास होत असल्याने बोलण्याचा त्रास होतो आहे. मात्र काही जण चुकीचा अर्थ काढून अपप्रचार केला जात आहे त्यामुळे मी हे निवेदन सादर करत आहे.”
प्रकाश सुर्वेंनी जारी केले निवेदन
“एकनाथ शिंदेंच्या कामाच्या धडाक्यामुळे राजकीय जीवनात हताश झालेले माझे विरोधक लोकोपयोगी कामे करण्याऐवजी व्हिडिओ मॉर्फ करून चारित्र्यहनन करणे अशा विकृत गोष्टी करत आहेत.” असा आरोप प्रकाश सुर्वे यांनी केला आहे. पुढे प्रकाश सुर्वे म्हणाले, प्रचंड गर्दीत आणि प्रचंड आवाजात मला बहिणीसमान असणाऱ्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे या कार्यक्रमाबाबत काही सांगत असतानाचा व्हिडिओ चुकीचे गाणे लावून मॉर्फ करून व्हायरल करण्यात आला. विकृत मानसिकेतून हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला गेला. या सर्व प्रकरणामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना प्रचंड मानसिक त्रास झाल्याचेही सुर्वे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community