काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच शिरसाटांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल ठोकला आहे. पण याप्रकरणात छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून संजय शिरसाटांना क्लिन चीट देण्यात आली आहे.
व्यक्ती समोर नसल्यामुळे विनयभंग होत नाही, असा निकष लावत छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून संजय शिरसाट यांनी क्लिन चीट मिळाली आहे.
(हेही वाचा – Devendra Fadnavis : निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य महत्त्वाचे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
नक्की प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर येथील जाहीर सभेत सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली होती. संजय शिरसाट म्हणाले होते की, ‘ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली आहेत, हे तिलाच माहीत.’
शिरसाटच्या या टीकेवर सुषमा अंधारे यांनी आक्षेप घेत महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली होती. तसेच अंधारे यांनी पुण्यात शिवाजीनगर न्यायालयात शिरसाटांविरोधात तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. पण आता शिरसाटांना संभाजीनगर पोलिसांकडून क्लिन चीट मिळाल्यामुळे याप्रकरणात पुढे काय घडते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community