संतोष बांगर हे कडवे ठाकरे सैनिक म्हणून ओळखले जायचे. आता ते शिंदे गटात सामील झालेले आहेत. त्यानंतर लगेच त्यांना हिंगोलीच्या जिल्हाध्यक्ष पदावरुन काढून टाकण्यात आले. परंतु शिंदेंनी म्हटले की बांगर हेच जिल्हाध्यक्ष असतील. शिंदेंनी या कृतीतून दाखवून दिले की उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेते नसून आपणच शिवसेनेचे सर्वोच्च नेते आहोत.
तर ‘कानाखाली जाळ काढल्या शिवाय आम्ही राहणार नाही’
त्यापुढे जाऊन संतोष बांगर यांनी मुंबईत शेकडो कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन केलं. एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ त्यांनी ’ हमारा नेता कैसा हो एकनाथ भाई जैसा हो’ अशी घोषणा केली. यावर शिंदे यांची प्रतिक्रिया गमतीदार होती. ते म्हणाले, ’ते म्हणाले हे शक्तीप्रदर्शन नसून हे प्रेमाचं प्रदर्शन आहे.’ हिंगोलीत परतल्यानंतर तर बांगरांनी धक्कादायक विधान केले, ”आम्ही भिणारे शिवसैनिक नाही. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला कोणी का रे म्हणलं, तर त्याच्या कानाखाली जाळ काढल्या शिवाय आम्ही राहणार नाही.”
( हेही वाचा : सेबीचे ईमेल अकाउंट हॅक, हॅकरकडून पाठविण्यात आले ३४ जणांना मेल)
आता प्रश्न असा आहे की संतोष बांगर कोणाच्या कानाखाली मारण्याची भाषा करत आहेत? कारण उठाव करणार्या आमदारांना गद्दार म्हणण्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुढे होते. ते थेट ठाकरेंनाच इशारा देत आहेत का? असं असेल तर ठाकरे नावाच्या प्रतिमेला हा मोठा धक्का आहे. बाळासाहेबांकडे बोट वर करण्याची कुणाची मानसिक क्षमता नव्हती. इथे थेट इशारा दिला जातोय. उद्धव ठाकरेंमुळे मातोश्रीचं महत्व आणि दरारा संपुष्टात आलेला आहे. आता महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाबद्दलचा आदर देखील संपुष्टात येईल असे वातावरण निर्माण झालेलं आहे.
Join Our WhatsApp Community