मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांना केली शरयु नदीची आरती

91

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार आणि आमदार यांचा रविवार, ९ एप्रिल रोजी अयोध्या दौरा होता, या
दौ-याच्या शेवटी शरयु नदीची पूजा करण्यात आली. त्यावेळी सर्वांनी भक्तीभावाने ही पुजा केली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अनेकदा मी दौ-याच्या आयोजनासाठी अयोध्येत यायचो, पण आज मुख्यमंत्री म्हणून मी दौ-याला आलो. येथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दौ-याचे उत्तम आयोजन केले. सर्वांच्या सहाय्याने हा दौरा सफल झाला आहे. अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय आहे. हा राजकारणाचा विषय नाही. इथे राम मंदिर व्हावे, अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्र होते. मी प्रोटोकाॅल न पाळता लोकांमध्ये गेलो त्यामुळे पोलिसांची गैरसोय झाली, पण जनतेत जाणे हेच माझे टाॅनिक आहे. पंतप्रधान मोदी यांचे हे स्वप्न साकार झाले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

(हेही वाचा पंतप्रधान मोदींनी बाळासाहेब ठाकरे, करोडो रामभक्तांचे स्वप्न पूर्ण केले – मुख्यमंत्री शिंदे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.