Shivsena आमदारांच्या सुरक्षेत आता केवळ एकच सुरक्षारक्षक असणार; आमदारांमध्ये नाराजी

87

मुंबई प्रतिनिधी 

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार काही नेत्यांची सुरक्षा (MLA Security) कमी करण्यात आल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील अनेक नेते नाराज झाले आहेत. प्रशासनाने ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Shivsena)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मंत्र्यांसह महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. काहींची सुरक्षा श्रेणी कमी करण्यात आली असून काहींच्या अंगरक्षकांची (Bodyguard) संख्या कमी केली गेली आहे. मात्र, शिवसेनेतील काही नेत्यांना (Shiv Sena leader) अजूनही संभाव्य धोका असल्याचा दावा करत, त्यांची सुरक्षा पूर्ववत ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे.

(हेही वाचा – दिल्लीतील RSS च्या नवीन मुख्यालयात 19 फेब्रुवारीपासून कामकाजाला सुरुवात)

या पार्श्वभूमीवर, काही नेत्यांनी नाराजी व्यक्त करत हे निर्णय राजकीय हेतूने घेतले जात असल्याचे आरोप केले आहेत. विरोधकांनीही सरकारवर टीका करत, “राजकीय सत्तेचा वापर करून ठरावीक नेत्यांवर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे,” असे म्हटले आहे. सुरक्षा कपातीवर (MLA Security reduction) सरकारकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, या मुद्द्यावरून राजकीय (Politics) वातावरण तापण्याची शक्यता आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.