राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकींचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. पालघरमध्ये शिवसेनेला भाजपाने मोठा दणका दिला आहे. पालघरमधील शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना भाजपाने धक्का दिला आहे. पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांचा पराभव झाला आहे. भाजपा उमेदवार पंकज कोरे यांनी गावितांचा पराभव केला आहे.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने लागलेल्या पोटनिवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून स्थानिक उमेदवाराला डावलून रोहित गावित यांना संधी देण्यात आली होती. त्यामुळेच शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला असल्याचे बोलले जात आहे.
(हेही वाचाः इंग्रजांना हाकललं आता मोदी सरकारलाही हाकलून देऊ! ‘या’ काँग्रेस नेत्याचे मोठे विधान)
म्हणून गावितांच्या मुलाचा पराभव
वणई गटात शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसैनिकांना डावलून आपला मुलगा रोहित यांना शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरवले होते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. याचमुळे गावितांच्या मुलाचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे.
धुळ्यात भाजपाचे वर्चस्व
धुळे जिल्ह्यात भाजपाने पुन्हा आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपाचे माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी पुन्हा शिंदखेडा तालुक्यात आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले आहे. लामकानी जिल्हा परिषद गटातून चंद्रकांत पाटील यांची कन्या धरती देवरे या विजयी झाल्या आहेत. त्यामुळे भाजपाला धुळे जिल्हा परिषदेत बहुमत राखण्यात यश आले आहे.
(हेही वाचाः धुळ्यात भाजपाचे वर्चस्व कायम! बहुमत राखण्यात यश)
Join Our WhatsApp Community