तो लढवय्या माणूस, शिवसेनेकडून बृजभूषण सिंह यांचे कौतुक

177

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौ-याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय आपण त्यांना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही ही आपली ठाम भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरुन आता राजकारण तापलेले असताना शिवसेनेकडून बृजभूषण सिंह यांचे कौतुक करण्यात येत आहे. बृजभूषण सिंह हे लढवय्ये आहेत, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

ते आपल्या भूमिकेपासून मागे हटणार नाहीत

बृजभूषण सिंह यांच्याशी माझी पूर्वीपासूनची ओळख आहे. खासदार नसल्यापासून माझे आणि त्यांचे चांगले संबंध आहेत. मला इतकं माहीत आहे की तो माणूस लढवय्या आहे. आम्ही त्यांना प्रेमाने नेताजी म्हणतो. ते उत्तम पहलवान आहेत. त्यांनी अनेक आखाडे निर्माण केले आहेत. तरुण कुस्तीगारांना राजकीय, आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावं म्हणून ते वर्षानुवर्ष काम करत आहेत. त्यामुळे ते आपल्या भूमिकेपासून मागे हटणार नाहीत, असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

(हेही वाचाः Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी मशिदीची सुनावणी लांबणीवर, न्यायालयाकडे निर्णय राखीव)

राज ठाकरेंवर साधला निशाणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पूर्वी एक भूमिका होती. ती त्यांनी का सोडली ते मला माहीत नाही. त्यांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उत्तर भारतीयांविरुद्ध आणि हिंदी भाषिकांविरुद्ध घेतलेली भूमिका त्यांनी एका रात्रीत बदलली. अचानक ते हिंदुत्ववादी झाले आणि अयोध्येत जायला निघाले, अशी शब्दांत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.