राऊतांच्या अटकेचे पडसाद संसदेतही उमटले, दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब

पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. त्यामुळे राऊतांना जामीन मिळणार की त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. ईडीने राऊतांना १६ तासांच्या चौकशीनंतर रविवारी अटक केली. दरम्यान, संजय राऊतांच्या अटकेचे पडसाद राज्यसभा आणि लोकसभेच्या कामकाजावर झाल्याचे पाहायला मिळाले.

(हेही वाचा- आता राऊतांनंतर पुढचा नंबर उद्धव ठाकरेंचा? निलेश राणेंचं सूचक वक्तव्य)

राऊतांच्या अटकेनंतर राज्यसभेच्या सभागृहातही पडसाद उमटू लागले आहेत. राज्यसभेचे पावसाळी अधिवेशन चालू असून विरोधकांकडून भाजपवर ताशेरे ओढण्यात येत आहेत. तर शिवसेना खासदारही यावेळी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सोमवारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.

दरम्यान, साधारण नऊ तासांच्या सखोल चौकशीनंतर राऊतांना ताब्यात घेण्यात आले त्यानंतर रविवारी रात्री उशीरा त्यांना अटक केली आहे. त्यानंतर भाजपवर टीकाही करण्यात येत असून याचे पडसाद राज्यसभेतही दिसून आले आहेत. तसेच राऊत यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईविरोधात शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. आजच्या सत्रात केंद्रीय यंत्रणांच्या दुरुपयोगावर चर्चा घ्यावी, यासाठी त्यांनी राज्यसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here