राऊत म्हणतात, मुंबई आमच्या बापाची

भाजपवर सातत्याने टीका करणा-या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपर जोरदार हल्ला चढवला आहे. ही मुंबई आमच्या बापाची आहे, तुमच्या सारख्या भडबुंजांची नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

आम्ही कोणीही असू, पण…

आम्ही भोंगे असू, पिपाण्या असू, शंख असू किंवा तुतारी असू तुमच्यावर भ्रष्टाचाराचे पुराव्यांसह आरोप झाले आहेत, त्यावर आधी बोला. मी अजूनही किरीट सोमय्या यांचा संबंध असलेल्या कंपन्यांची नावे घेतलेली नाहीत, त्यामुळे आम्ही कोण आहोत ते सोडून द्या. मी या मुंबईचा एक मराठी माणूस आहे, ही मुंबई आमच्या बापाची आहे, तुमच्यासारख्या भडबुंजांची नाही. तुम्ही मुंबईला लुटताय म्हणून आधी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या, असे विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

(हेही वाचाः आम्ही फालतू विषयांवर बोलत नाही, राणांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर)

भाजपचं डोकं ठिकाणावर आहे का?

विक्रांत घोटाळ्यात किरीट सोमय्या यांची जामिनावर सुटका झाली आहे. मी कायम त्यांच्याविरोधात पुरावे दिले आहेत, तरीही त्यांना अजून कसले पुरावे हवे आहेत. त्यामुळे सोमय्या यांना वेड लागले आहे आणि या वेड्याला घेऊन भाजपवाले नाचत आहेत. त्यामुळे भाजपचं डोकं ठिकाणावर आहे का, हे लवकरच कळेल, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here