…तर फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील, राऊतांचा हल्लाबोल

92

राज्यातील राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा दारूण पराभव झाला. तर भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा दणदणीत विजय झाला. राज्यसभा निवडणुकीत अपक्षांना फोडण्यात भाजप यशस्वी झाल्याने शिवसेनेच एकच खळबळ उडाली. याच राजकारणावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले राऊत

अपक्ष आमदारांनी कोणाला पाठिंबा दिला हे आम्हाला सगळे माहीत आहे. म्हणून बोललो विषय संपला. एक विजय झाला, एक पराभव झाला म्हणजे अणूबॉम्ब कोसळला असे होत नाही. महाप्रलय आला असे होत नाही. अनेक राज्यात असा निकाल लागला आहे. राजस्थानात काँग्रेस जिंकली. हरियाणात रडीचा डाव करून अजय माकन यांचा पराभव केला. महाराष्ट्रात आयोगाला हाताशी धरून इथले लोक काय करत होते सर्व माहीत आहे. पुढे बोलताना राऊत म्हणाले, केंद्रीय गृहखात्याकडून निवडणूक आयोगाला वारंवार फोन जात होता. कोणाची मतं बाद करायची आणि कोणाची नाही, याचे निर्देश दिले जात आहे. यंत्रणा आशच्याकडेही आहेत. फक्त ईडी नाही. फक्त ईडी आमच्याकडे 48 तासासाठी दिली तर भाजपही आम्हाला मतदान करेल.

अपक्ष आमदारांबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आम्हाला कोणत्याही अपक्षाचा अवमान करण्याचा प्रश्न नाही. त्यांचा अपमान करायचा नव्हता. असे सांगताना दोन दिवस आमच्या हातात ईडी दिली तर देवेंद्र फडणवीसदेखील शिवसेनेला मतदान करतील, असे म्हणत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव आहे. आम्हाला पंकजा मुंडेंची चिंता आहे. आणि आम्हाला चिंता करण्याचा अधिकार आहे. मुंडे कुटुंबाचं आणि शिवसेनेचं जिव्हाळ्याचं नातं आहे, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – दिल्लीतील गफ्फार मार्केटमध्ये भीषण अग्नितांडव! 39 गाड्या घटनास्थळी रवाना)

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.