शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा ईडीवर हल्लाबोल केला आहे. आमच्या एखाद्या शिवसैनिकाची वडापावची गाडी असेल तर त्यावरही ईडी कारवाई करेल अशी भीत वाटत असल्याचा टोला संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. महाराष्ट्र आणि बंगालमध्ये राज्यपाल फक्त राज्य सरकारांवर निशाने साधतात. इतरही राज्यात राज्यपाल आहेत, इतरही राज्यात ईडीचे कार्यालय आहेत. मात्र तिथे असं होत नाही. फक्त महाराष्ट्र बंगालमध्ये असं होतं याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या, असं राऊत म्हणाले.
विरोधी पक्षनेते बोंबलले की सुडाची कारवाई सुरू
यासंदर्भात राऊत म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा सूड भावनेने तपास आणि कारवाई करीत आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा गृह विभाग किंवा महाराष्ट्र सरकार कधीच कारवाई करणार नाही. महाराष्ट्राच्या गृह विभागाला एक प्रतिष्ठा व परंपरा आहे. ते कायद्याचे पालन करूनच कारवाई करतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षनेते बोंबलले की सुडाची कारवाई सुरू आहे, तरी आम्हाला सुडाची कारवाई करायची नाही.
(हेही वाचा -“मविआ म्हणजे खाऊंगा भी, और…”, अमृता फडणवीसांची खरपूस टीका)
राऊतांचा भाजपला टोला
आम्हाला सुडाची कारवाई करायची असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांकडून प्रशिक्षण घ्यावे लागेल, असाही टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या आणखी एका संपत्तीवर कारवाई केल्याबद्दल राऊत यांना विचारले असता पूर्ण माहिती मिळाली की, त्यावर बोलेन असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली
Join Our WhatsApp Community