ईडीच्या दोन नोटीसा आणि तीन दिवसाचा वेळ घेतल्यानंतर शुक्रवारी शिवसेनेचे नेते संजय राऊत हे ईडी कार्यालयात दाखल झाल आहेत. केंद्रीय संस्था ईडी असली तरी या संस्थेच्या कारभारावर संजय राऊत यांनी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र या चौकशीला सामोरे जात असताना राऊतांचा या संस्थेबाबतचा सूर काहीसा बदललेला दिसून आला. यावेळी राऊत म्हणाले, ईडी ही एक केंद्रीय संस्था आहे पण यावर आपला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले राऊत
माध्यमांसमोर बोलताना संजय राऊत म्हणाले, मी पळपुटा नाही. माझा देशातील केंद्रीय संस्था आणि ईडीवर विश्वास आहे. त्यामुळे ईडीच्या चौकशीला सामोर जाण्याची हिम्मत आहे. राज्याचा खासदार, नागरिक म्हणून या केंद्रीय संस्थाना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. आज, शुक्रवारी ईडीकडून राऊतांची चौकशी होत आहे. दरम्यान, ईडी चौकशीला सामोरे जाण्याआधी त्यांनी माध्यमांना अशी प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचा – शिंदे मुख्यमंत्री होताच आनंद दिघेंच्या पुतण्याने केली ‘ही’ मोठी मागणी)
पुढे राऊत म्हणाले, मी निर्भय आहे, निडर असल्याने बेधडकपणे ईडीच्या कारवाईला समोर जाणार आहे. मी कधीच चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मी बेडरपणे ईडी चौकशीला सामोरा जाणार आहे. असेही स्पष्ट करत राऊत म्हणाले, ईडी सारख्या संस्थांना हाताशी धरून सुडाचे राजकारण केले जात आहे, यामुळे लोकशाही धोक्यात आहे. राऊत यांची शुक्रवारी ईडीकडून पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार आहे. यावेळी ईडी कार्यालयासमोर राऊतांनी आपले मत व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community