शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी फोन टॅपिंगवरून भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे फोन टॅपिंगचा पॅटर्न राबवला जात असून माझे आताही फोन टॅप होत आहेत. महाराष्ट्रात फोन टॅपिंगचा विषय परत एकदा सुरू झाला आहे. एकनाथ खडसे आणि माझे फोन टॅप होत होते. त्याबद्दल कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एक गुन्हा पुणे बंडगार्डनला दाखल झाला आहे. निवडणुकीनंतर ज्या हालचाली सुरू होत्या. त्यावेळीही फोन टॅपिंग झाले. आम्ही कुणाशी बोलतो, कुणाला भेटतो, काय करतो ही माहिती त्यावेळच्या पोलीस अधिकारी कुणाला देत होते हे सर्वांना माहीत आहे, असे संजय राऊत म्हणाले.
काय म्हणाले राऊत?
माध्यमांचे संवाद साधताना राऊत पुढे म्हणाले की, सुदीन ढवळीकर आणि विजय सरदेसाई हे प्रमुख पक्षांचे नेते आहेत त्यांचेही फोन टॅप होत आहेत. फोन टॅपिंगचा कार्यक्रम उत्तम प्रकार सुरू आहे. गोव्यात शांतता फोन टॅपिंग सुरू आहे. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे, अशी टीका करतानाच महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते तेच निवडणूक काळात गोव्याचे प्रमुख होते, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. आम्ही काळजी घेत आहोत. तसेच दिगंबर कामत यांच्यासोबत आम्ही आहोत, असं त्यांना सांगितल्याचंही राऊत म्हणाले.
(हेही वाचा – पोलिसांसमोर हजर होण्यापूर्वी राणे म्हणाले, ‘…आपने शुरू किया’)
१० मार्चनंतर त्रिशंकू विधानसभा आली तर…
महाराष्ट्रात जे चाललंय ते निकालानंतर गोव्यात सुरू होणार असून १० मार्चनंतर त्रिशंकू विधानसभा आली तर केंद्रीय यंत्रणा गोव्यात सुद्धा जातील, असा दावा राऊतांनी करत आम्ही पहिल्या दिवसांपासून हे सांगत असल्याचे म्हटले. फोन टॅपिंग ही त्यांची पूर्व तयारी आहे. त्यांनी या आधी महाराष्ट्रातही अशाप्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत आणि इतर राज्यांमध्येही केले जातील मात्र त्यांना यश मिळणार नाही, असेही राऊतांनी म्हटले.
Join Our WhatsApp Community