चंद्रकांत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त दोन तासच झोपतात. ती दोन तासही झोप लागू नये, म्हणून ते प्रयत्न करत आहेत असं वक्तव्य केलं होतं. त्यावर उत्तर देताना, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सणसणीत टोला लगावला आहे. ही चमचेगिरीची हद्द आहे. असे चमचे कधी पाहिले नाहीत, असं म्हणत राऊतांनी पाटलांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.
तरीही भाजपाने केली युती
जम्मू काश्मिरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्याशी केलेल्या युतीवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे. कारण मेहबूबा मुफ्ती या भारतीय जनता पक्षाच्या मैत्रिण होत्या. मेहबूबा मुफ्ती यांचा राजकीय पक्ष आहे. तो पहिल्यापासून फुटीरतावाद्यांना मदत करणारा, पाकिस्तानला काश्मीरचा चर्चेत ओढणारा, अतिरेक्यांनी विषयी सहानुभूती दाखविणारा पक्ष होता. तरीही या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीने युती करून सत्ता उपभोगली, असं ते म्हणाले. तरीही या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीने युती करून सत्ता उपभोगली त्याच काळात कश्मिरी पंडित आन वर हल्ले झाले. त्याच काळात जे अतिरेकी लष्कराने मारले त्या अतिरेक्यांना मेहबूबा मुफ्तींकडून स्वातंत्र्यसैनिक बनवण्याचा प्रयत्न झाला, तरीदेखील भारतीय जनता पक्ष सरकारमधून बाहेर पडला नाही आणि आता काश्मीर फाईल बनवत आहेत. मेहबूबा मुफ्ती आणि त्यांच्या पक्षाला ताकत देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केला आहे. त्यामुळे या सगळ्यात जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे.
( हेही वाचा: आता करु शकता परदेश वारी! आंतरराष्ट्रीय विमानसेवा तब्बल दोन वर्षांनी सुरु )
मोदींची दोन तासांची झोपही उडेल
आम्ही महाराष्ट्रात पाहतो आहे की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत पाटील त्यांनी फार एक ऐतिहासिक विधान केलं आहे या जगात दुसरं कोणी काम करत नाही. फक्त प्रधानमंत्री मोदी हे 22 तास काम करतात त्यांना फक्त दोन तास जेमतेम झोप मिळते, पण चंद्रकांत दादा पाटील यांचं असं म्हणणं आहे की ते संशोधन करत आहेत की जी दोन तास त्यांना झोप मिळते ती देखील मिळू नये आणि चोवीस तास त्यांनी काम करावं हे ऐकून मोदींची दोन तासांची झोप देखील उडाली आहे. चमचेगिरी तर सगळीकडेच होते पण असेच चमचे आम्ही पाहिले नाहीत.
Join Our WhatsApp Community