मातोश्रीवर खासदारांची बैठक संपन्न झाली, त्यात सर्वच खासदार संजय राऊतांच्या विरोधात गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. राष्ट्रपतीपदासाठी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना समर्थन द्यावे, असा दबाव उद्धव ठाकरेंवर आहे. आता उद्धव ठाकरे कोणाला समर्थन देतील हे काही दिवसांत कळेलच.
पण या बैठकीच्या निमित्ताने शिवसैनिक संजय राऊतांवर नाराज आहेत. यावर शिक्कामोर्तब झाला. या बैठकी दरम्यान संजय राऊत रागात कुणाशी न बोलता निघून गेल्याचीही चर्चा आहे. संजय राऊत गेली अडीच वर्षे खूप बोलत आहेत. चाळ संस्कृतीत नळावर पाणी भरताना अधिक भांडणे होतात, अधिक गप्पा होतात असं गंमतीने म्हटलं जातं. त्या भांडणाला वा गप्पांना तसा फारसा अर्थ नसतो. अगदी तशाप्रकारेच संजय राऊत जणू सकाळी उठून काहीतरी बोलायचे, नित्यनेमाने प्रेस कॉन्फरेन्स घ्यायचे. मग दिवसभर पत्रकारांना रवंथ करायला काहितरी विषय मिळायचा. हा मनोरंजनाचा कार्यक्रम गेली अडीच वर्षे सुरु होता.
( हेही वाचा: युवा सेनेने केला शिवसेनेचा घात? )
संजय राऊतांनी अनेकांवर तोंडसुख घेतलेलं आहे. त्यांनी पत्रकारांसमोर महिलांनादेखील गलिच्छ शिव्या दिल्या आहेत. राज ठाकरेंनीदेखील आपल्या भाषणात राऊतांचा सामाचार घेतला आहे. त्यांनी राऊतांना उद्देशून असं म्हटलं होतं की आता तुम्हाला एकटं बोलण्याचा सराव करावा लागेल. त्यावेळी राज ठाकरेंच्या विधानाची खिल्ली उडवली गेली. पण आज संजय राऊत आता हळूहळू एकटे पडत आहेत. प्रत्येक शिवसैनिकाला संजय राऊत नकोत. मागे मोहित कंबोज यांनी सलीम-जावेद जेलमध्ये जातील असं ट्विट केलं होतं. त्यातले सलीम म्हणजे नवाब मलिक आणि जावेद म्हणजे संजय राऊत आहेत.
Join Our WhatsApp Community