शिवसेनेला आता चिन्हाची चिंता, निवडणूक आयोगाकडे धाव

143
विधिमंडळातील दोन तृतीयांश आमदारांचे संख्याबळ असलेला एकनाथ शिंदे यांचा गट आता शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण यावर दावा सांगण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे कॅव्हेट दाखल केले आहे, अशी माहिती मिळत आहे.

शिंदे गट चिन्हावरही दावा करणार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आधीच विधिमंडळात शिवसेना पक्षावर दावा सांगितला आहे. याप्रकरणी २ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. त्यावर सोमवारी, ११ जुलै रोजी सुनावणी होणार होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावरील सुनावणी पुढे ढकलली आहे. मात्र आता शिंदे गट शिवसेनेच्या चिन्हावरही दावा करेल, अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यांच्याकडे शिवसेनेच्या चिन्हांबाबत कॅव्हेट दाखल केले आहे. यावर आमची बाजू समजून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका, अशी विनंती शिवसेनेने केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.