शिवसेनेकडून आता नारायण राणेंवर कौतुकाचा ‘वर्षा’व!

नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा संपताच दुसऱ्या दिवसापासून मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागताच मंगळवारी 'सामना' मधून राणेंवर कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायला मिळाले.

147

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या वेळी राणे आणि शिवसेना यांच्या मोठे घमासान पाहायला मिळाले, या दरम्यान राज्य सरकारने तर राणे यांना मुख्यमंत्र्यांचा अवमान केला म्हणून त्यांना अटकही करण्यात आली होती. हे यात्रा संपताच दुसऱ्या दिवसापासून परिवहन मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी यांना ईडीच्या नोटीस आल्या, धाडी पडू लागल्या. परिणामी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मंगळवारी या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्र्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनसीपीच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. तर ज्या शिवसेनेने मुखपात्र सामानातील अग्रलेखातून नारायण राणेंवर जहरी टीका केली, मंगळवारी त्याच अग्रलेखातून राणेंवर चक्क कौतुकाचा वर्षाव करण्यात आला आहे.

राणेंच्या तोंडात साखर पडो!

महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला सुगीचे दिवस येण्यासाठी माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून मी सर्वतोपरी प्रयत्न करीन, असे केंद्रीय मंत्री राणे यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात सांगितले. जे त्यांनी यात्रेच्या सुरुवातीला सांगायला हवे होते ते त्यांनी सगळय़ात शेवटी सांगितले! कोकणात त्यांच्यामुळे धुमशान झाले व विधायक सर्व बाजूला राहिले. महाराष्ट्र हे राजकीय मतभेदांपलीकडे, विकासाकडे पाहणारे राज्य आहे. राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या दिवशी एक विधायक भूमिका घेतली. त्यामुळे ‘सामना’ने विधायक कार्याला पाठिंबा दिला. महाराष्ट्र खाऊन-पिऊन सुखी आहे. ठाकऱयांचे नेतृत्व भक्कम आहे. अजित पवारही अर्थमंत्री म्हणून ज्ञानी आहेत. अज्ञानाचा अंधकार महाराष्ट्रावर कधीच पसरला नव्हता, तरीही केंद्रीय मंत्री राणे राज्याला सुगीचे दिवस आणायचे म्हणतात, त्यांच्या तोंडात साखर पडो!, असे शिवसेनेने म्हटले आहे.

राणेंच्या मंत्रालयाचा आवाका मोठा!

केंद्र सरकारने रोजगारनिर्मितीवर भर द्यायलाच हवा व त्यासाठी नवे उद्योग निर्माण करावे लागतील, पण सरकारी उद्योग विकायला काढून केंद्र सरकार कारभार चालवत आहे. चीनची अर्थव्यवस्था लहान उद्योगांवर तरारली आहे व त्या लहान उद्योगांवर निर्माण झालेल्या वस्तूंची आर्थिक उलाढाल हजारो कोटींची आहे. चीन जो माल हिंदुस्थानच्या बाजारात पाठवीत आहे तो देशातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांत मोडतो. आज चीनमधून दिवाळीच्या पणत्या, वहय़ा, पुस्तके, रबर बॅण्ड, लेखण्याही आपल्याकडे येत आहेत. बाथरूममधले ब्रास फिटिंग्ज, रस्त्यावर, लोकल ट्रेन्समध्ये सर्रास विकल्या जाणाऱया किचेन्स, चष्म्याच्या कांडय़ा, गरम-थंड पाण्याचे थर्मास हे लघु-मध्यम उद्योगांशी संबंधित उत्पादन आहे व हा सर्व माल ‘चीन’मधूनच आपल्याकडे येत असतो व त्याची आर्थिक उलाढाल मोठी आहे. अगदी कुंकू आणि टिकल्याही येऊ लागल्या. गेल्या वर्षी हिंदुस्थान आणि चीन यांच्या दरम्यान ८७न अब्ज डॉलर्स एवढा व्यापार झाला. आपल्या एकूण आयातीत चीनचा वाटा तब्बल ६७ टक्के आहे. हिंदुस्थानच्या बाजारातील उलाढालीतून चीनला आर्थिक बळ मिळते व यातले अनेक उद्योग हे लघु-मध्यम क्षेत्रात मोडतात. राणे या उद्योगांना देशात उभे करून देशाची अर्थव्यवस्था व रोजगारनिर्मिती करू शकतात, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

संपूर्ण देश राणेंकडे आशेने पाहतो! 

राणे म्हणतात, केंद्रीय मंत्रीपदाचा उपयोग राज्याच्या विकासासाठी करणार. आम्ही म्हणतो, संपूर्ण देश तुमच्याकडे आशेने पाहील असे काम करा. चामडय़ाच्या वस्तू, प्लॅस्टिकची खेळणी, फण्या, छत्र्या, छोट्या शैक्षणिक संस्था तसेच ब्युटीपार्लर्स, गॅरेज, फोटोग्राफी लॅब, एसटीडी बुथ, लॉण्ड्री- ड्राय क्लिनिंग व्यवसाय, खादी उत्पादने, छपाईची कामे, फर्निचर, लाकडाची उत्पादने, पोल्ट्री फार्म, कॉल्स सेंटर्स, टेस्टिंग लॅब्स, काचेची उत्पादने, टाईल्स निर्मिती असे असंख्य उद्योग लघु-मध्यम-सूक्ष्म क्षेत्रांत मोडतात व त्यातून रोजगारनिर्मिती होते. त्यामुळे राज्याच्या व देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणाऱया या मंत्रालयाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री राणे विकासाचे स्वप्न पाहणार असतील तर ते कोणाला नको आहे? महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्राला सुगीचे दिवस येण्यासाठी माझ्या मंत्रालयाच्या माध्यमातून मी सर्वतोपरी प्रयत्न करीन, असे केंद्रीय मंत्री राणे यांनी त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात सांगितले. जे त्यांनी यात्रेच्या सुरुवातीला सांगायला हवे होते ते त्यांनी सगळय़ात शेवटी सांगितले! कोकणात त्यांच्यामुळे धुमशान झाले व प्रकरण टोकाला गेले व मोदी यांना जे अपेक्षित होते त्याचा धुरळा सगळय़ात शेवटी उडाला. आधी फक्त शब्दांचाच चिखल उडत राहिला. त्यात विधायक सर्व बाजूला राहिले. महाराष्ट्र हे राजकीय मतभेदांपलीकडे, विकासाकडे पाहणारे राज्य आहे. कोरोनाने विस्कटलेल्या आर्थिक घडीतून महाराष्ट्रही सावरतो आहे. केंद्रातले महाराष्ट्राचे मंत्री जे कोणी असतील ते. महाराष्ट्राचे हित पाहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. श्री. राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या दिवशी एक विधायक भूमिका घेतली. त्यामुळे ‘सामना’ने विधायक कार्याला पाठिंबा दिला. महाराष्ट्र खाऊन-पिऊन सुखी आहे. ठाकऱयांचे नेतृत्व भक्कम आहे. अजित पवारही अर्थमंत्री म्हणून ज्ञानी आहेत. अज्ञानाचा अंधकार महाराष्ट्रावर कधीच पसरला नव्हता, तरीही केंद्रीय मंत्री राणे राज्याला सुगीचे दिवस आणायचे म्हणतात, त्यांच्या तोंडात साखर पडो!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.