माफीनाम्यावर शिवसैनिक कायम, पोलिस ठाण्यावरही केली गर्दी

82

मातोश्रीच्या समोर हनुमान चालिसेचे पठण करण्याचे आव्हान देणाऱ्या आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना अटक केल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. त्यांच्या अटकेनंतर युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी मुंबई आपल्या साहेबांचीच… नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा दिल्या.

मात्र, राणा दाम्पत्याला ताब्यात घेऊन त्यांना खार पोलिस ठाण्यात आणण्यात आले. परंतु तिथेही शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले. जोवर राणा दाम्पत्य माफी मागत नाही, तोवर आपण इथून हटणार नाही, असा पणच या शिवसैनिकांनी केला आहे.

(हेही वाचाः उद्धव ठाकरेंना वाघ आवडतो की बकरी? नारायण राणेंचा सवाल)

शिवसैनिकांचा जल्लोष आणि घोषणाबाजी

राणा दाम्पत्याला शनिवारी संध्याकाळी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलिस ठाण्यात त्यांना अटक करण्यात आली. परंतु आपल्या घरी आलेल्या पोलिसांकडून त्यांनी अटक वॉरंटची मागणी केली. पण त्यानंतरही पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राणा दाम्पत्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जमलेल्या शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. यावेळी युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर बसून झेंडा फडकावत, मुंबई आपल्या साहेबांचीच… नाही कुणाच्या बापाची!, निमका पत्ता कडवा है, रवी राणा xxx है, शिवसेना झिंदाबाद…, उध्दव साहेब अंगार आहे, बाकी सब भंगार है, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. तर युवा सेनेचे राहुल कनाल यांनी पेढे वाटप करत आनंद व्यक्त केला.

(हेही वाचाः राणा दाम्पत्याची मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार, काय आहेत आरोप?)

आम्ही कुठेही जाणार नाही

दरम्यान, राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर खार पोलिस ठाण्याबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करण्यास सुरुवात केली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर सर्व शिवसैनिकांनी घरी जावे, असे आवाहन शिवसेनेच्या नेत्यांनी केले होते. परंतु त्यानंतरही काही शिवसैनिक खार पोलिस ठाण्यासमोर जमू लागले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राणा दाम्पत्याने माफी मागायला हवी. जोवर ते माफी मागणार नाही तोवर आम्ही सोडणार नाही. आम्ही इथेच राहणार असा निर्धार त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलून दाखवला.

(हेही वाचाः राणा दाम्पत्यावर ‘या’ कलमांतर्गत गुन्हा दाखल, काय होणार कारवाई?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.