Shivsena : शिवसेना भवनसमोर झेंडे लावत शिवसेनेने दिले उबाठाला आव्हान

158

यंदाच्या दिवाळीमध्ये शिवसेना भवन परिसरामध्ये शिवसेनेचा (Shivsena) एकही कंदील लावू न देणाऱ्या शिवसेना (उबाठा) पक्षाने केला असला तरी याच शिवसेना पक्षाचे झेंडे आता या शिवसेना भवन परिसरात पहायला मिळत आहे. शिवसेना भवनच्या समोरच आता शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह असलेले भगवे ध्वज लावलेले आहे. त्यामुळे कंदील नाही पण झेंडे लावत शिवसेनेचे शिवसेना भवन परिसरात भगवे ध्वज लावत एकप्रकारे उबाठा शिवसेनेला आव्हानच दिले आहे.

मनसेने या परिसरात आपले कंदील आणि झेंडे उभारले

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भवन परिसरात मोठ्या प्रमाणात कंदील युध्द दरवर्षी रंगते. परंतु या वर्षी दसऱ्याला शिवसेना (Shivsena) उबाठा गटाचे माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांनी शिवसेना भवनसमोर मोठ्या आकाराचा आकाश कंदील लावून ही महत्वाची जागा अडवून ठेवली. त्यानंतर मनसेने या परिसरात आपले कंदील आणि झेंडे उभारले. याशिवाय शिवसेना उबाठा गटाच्या विभागप्रमुखानेही आकाश कंदील लावून येथील जागा अडवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य नेता असलेल्या शिवसेनेला या परिसरात कंदील लावण्यास जागा शिल्लक ठेवली नव्हती.

(हेही वाचा Shivsena : उद्धव ठाकरे ‘त्या’ शाखेपर्यंत पोहोचलेच नाहीत; कारण…)

दादर माहिमचे आमदार सदा सरवणकर आणि दक्षिण मुंबईचे खासदार राहुल शेवाळे हे शिवसेनेत असून या भागाचे प्रतिनिधीत्व करत असतानाही शिवसेनेला (Shivsena) या भागात कंदील लावता येत नाही. दरवर्षी आमदार सदा सरवणक आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे या भागात कंदील लावून मनसेला याठिकाणी कंदील तसेच कमानी उभारण्यास जागा शिल्लक ठेवत नसत. परंतु आता तेच सरवणकर शिवसेनेत असताना त्यांना या भागात कंदील किंवा अन्य कमान उभारता आलेली नाही. त्यामुळे उबाठा शिवसेनेला आता शिवसेनेनेच शह देत शिवसेना भवनसमोरच धनुष्यबाण चिन्ह असलेले झेंडे लावलेले आहे. कोहिनूर टॉवर समोरील पदपथावरील रेलिंगलाच शिवसेनेने हे झेंडे लावलेले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.