प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईकांची युवासेनेतून हकालपट्टी

161

आमदार प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईकांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य ठाकरेंच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. शिंदे गटाशी सलगी केलेल्यांवर तसेच शिंदे गटात सामील झालेल्यांवर शिवसेनेकडून कारवाई करण्याचे सत्र सुरू आहे. अशातच पुर्वेश सरनाईकांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

(हेही वाचा – आरे कारशेडचं काम सुरू होणार, मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती मागे)

दरम्यान, शिवसेनेकडून अनेक नव्या नियुक्त्या देखील करण्यात येत आहेत. तर एकामागे एक आमदारांसह खासदारांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. शिंदे गटात प्रताप सरनाईक सामील झाल्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांच्या मुलावर कारवाई करण्यात आली आहे. तर सरनाईकांच्या बंडामुळे आता पुर्वेश यांच्यावरही कारवाई झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्यासह सहसचिव किरण साळी यांची देखील युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

शिंदे गटाने मंगळवारी शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. वरुण सरदेसाईंची युवासेना राज्य सचिवपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तर वरूण सरदेसाई यांच्या हकालपट्टीनंतर शिंदे गटाकडून किरण साळी यांची या युवासेना राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच शिवसेनेच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव किरण साळी यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात साळी सहभागी झाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने अधिकृत राजीनामा दिला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.