शिवरायांचा अवमान: दुस-या दिवशीही सेना आक्रमक

111

कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क ), लालबाग आणि चेंबूर येथे मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी भाजपाच्या  नेत्यांवर टीका केली आहे.

तुम्ही तुमच्या सरकारला सांगा अन्यथा 

कर्नाटकात भाजप सरकार आहे, तरीही देशासाठी दैवत असणाऱ्या शिवरायांचा अपमान होतो आणि कोणतीच कारवाई होत नाही हे दु्र्दैवी आहे. कानडी बांधवांनो, तुम्ही महाराष्ट्रात रहाता इथे तुम्हाला त्रास होत नाही. शाळा बंद केल्या जात नाहीत. तुम्ही तुमच्या सरकारला सांगा अन्यथा महाराष्ट्रात राहणं कठीण होईल, असा इशाराही अरविंद सावंत यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपाचे चंद्रकांत पाटील यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. चंपा असो वा दंफा असो, कोणतीही मनमानी चालवून घेणार नसल्याचेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी केली हल्ल्याचा निषेध 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अपमानाच्या प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई कठोर भूमिका घेताना दिसत आहेत. बसवराज बोम्मई यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या प्रकरणातील दोषींना सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री अराग ज्ञानेंद्र यांना दिले आहेत. राज्यात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्यानंतर झालेल्या तोडफोडीच्या घटनांमध्येही पोलीस कडक भूमिका घेत आहेत. या प्रकरणात  पोलिसांनी आतापर्यंत 27 जणांना अटक केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.