महापालिकेवरील आरोपावरून शेवाळेंनी आदित्य ठाकरेंचा अशा शब्दात घेतला समाचार

105

मुंबईतील रस्त्यांचे कंत्राट रद्द झाल्याने रस्त्यांची कामे होणार कशी असा सवाल करत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असल्याची टिका केली. याचा परखड शब्दांत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी समाचार घेतला. मुंबई महानगरपालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, हे आदित्य ठाकरेंच्या मनातील शब्द आज ओठावर आल्याची टिका करत शेवाळे यांनी यावरून त्यांची मुंबई महानगरपालिकेकडे बघण्याची दृष्टी नेमकी कशी आहे, हे स्पष्ट होते, असा शब्दांत समाचार घेतला.

( हेही वाचा : …तेव्हा नेहरुंनी शपथ घेतली होती, मी ब्रिटिश सम्राट आणि त्याच्या वंशजांशी आजन्म निष्ठा राखीन!)

शिवसेना नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेतील रखडलेल्या कामांसंदर्भात सरकारवर टिका केली. याचा समाचार घेताना बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे यांनी, मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची जाणीव त्यांना आत्ता झालीय. वास्तविक, गेले २०-२५ वर्षं महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे खड्ड्यांवर बोलण्याचा त्यांना अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुम्ही २०-२५ वर्ष केलेले खड्डे आम्ही नक्कीच भरुन काढू आणि राज्याचे मुख्यमंत्री या खड्ड्यातून जनतेला नक्कीच बाहेर काढतील,असा विश्वासही व्यक्त केला. यासाठी नवीन पद्धतीची टेंडरप्रक्रीया राबविण्यात येईल. एक ते दोन महिन्यात वेगाने खड्ड्यांची कामे पूर्ण होतील,असेही त्यांनी सांगितले.

बदल्यांचे अधिकार तेव्हा आदित्य आणि वरुण सरदेसाईंंकडेच होते

शासकीय बदल्यांबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे, असे सांगत शेवाळे यांनी याआधी जे सरकार अडीच वर्षं होते, त्यावेळी बदल्यांचे सर्व अधिकार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि युवा सेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्याकडे होते. बदलीबाबत आम्हाला पालिका आयुक्त सांगायचे की, ‘तुम्ही आदित्य ठाकरे किंवा वरुण सरदेसाई यांना भेटा’ असाही गौप्यस्फोट शेवाळेंनी केला.

राहुल गांधीची गळाभेट का घेतली,ते आधी सांगा!

वास्तविक, आम्हाला असे वाटले होते की, काँग्रेसच्या राहुल गांधीनी, स्वातंत्र्यवीर सावरकरजींचा जो अपमान केला, त्याचा निषेध करण्यासाठी ही पत्रकार परिषद असेल, पण या पत्रकार परिषदेत कोणत्याही प्रकारचा निषेध नोंदविण्यात आला नाही. त्यामुळे आमच्यावर आरोप करण्यापूर्वी तुम्ही राहुल गांधीची गळाभेट का घेतली, ते सांगांवे, असाही सवाल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंना केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.