राज्याच्या राजकीय वर्तुळात सर्वच घडामोडी अनपेक्षितपणे घडत आहे. दरम्यान, लोकसभेच्या गटनेते पदी राहुल शेवाळे यांची नेमणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असल्याचे समोर येत आहे. या पत्रात शिंदे गटाने शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता द्या, अशी विनंती केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला हे पत्र लिहिले असून आमच्याकडे दोन तृतियांश संख्याबळ आहे. 50 आमदार आणि 12 खासदारही आमच्याकडेच आहेत. त्यामुळे आम्हीच शिवसेना असल्याचे म्हटले आहे. दिल्लीत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आले.
शिवसेना नक्की कुणाची?
दरम्यान, विधानसभेतील आमदारांमध्ये फूट पाडल्यानंतर आपण शिवसेना सोडली नसून सर्वजण शिवसेनेतेच असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत होता. शिंदे गटाने भाजपसह जात राज्यात सरकारदेखील स्थापन केले. त्यानंतर शिंदे गटात अनेक पदाधिकारी, नगरसेवक, खासदार शिंदे गटात सहभागी झाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून बंडखोरांवर कारवाई करण्यात आली. त्यानतंर शिंदे गटाने ठाकरे यांच्या नेतृत्वातील कार्यकारणी बरखास्त केल्याची घोषणा करून स्वतःची नवी कार्यकारणी जाहीर केली. या नव्या कार्यकारणी नंतर शिंदे गट आता आपला शिवसेनेवर दावा करणार असल्याची चर्चा होती.
(हेही वाचा – शिवसेना भवन नक्की कुणाचे?)
तर शिंदे गटातील खासदारांकडे लोकसभेचे गटनेतेपद गेल्यानंतर या खासदारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला मंगळवारी रात्री उशिरा एक पत्र दिले. या पत्रात बंडखोर खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना खरी असून त्यांना मान्यता द्यावी अशी विनंती केली असल्याचेही सांगितले जात आहे.
Join Our WhatsApp Community