ऋतुजा लटके यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

94

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार ऋतुजा रमेश लटके यांनी सोमवारी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी त्यांना शपथ दिली.

( हेही वाचा : राज्यात २९ लाख १२ हजार मतदारांची नावे वगळली)

विधानसभेचे सदस्य रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी (पूर्व) या विधानसभा मतदारसंघातील रिक्त झालेल्या विधानसभा सदस्यांच्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके विजयी झाल्या आहेत.

विधान भवनात झालेल्या या शपथविधी समारंभाला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी मंत्री तथा विधानपरिषद सदस्य ॲड. अनिल परब, विधानसभा सदस्य सुनिल प्रभू याचबरोबर विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, अध्यक्षांचे सचिव राजेश तारवी, महेंद्र काज आणि लटके कुटुंबीय व कार्यकर्ते उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.