दादा-राऊतांमध्ये कलगीतुरा, चंद्रकांत पाटलांच्या टीकेला राऊतांनी दिले असे उत्तर

कोरोनाची तिसरी लाट येणार नाही हे भाकीत करण्यासाठी मी काही उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. या टीकेला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील यांचे मानसिक स्वास्थ्य नीट केले पाहिजे. सरकार येत नाही म्हणून ते वैफल्यग्रस्त आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

तर मला अटक करा
राज्यपाल आमच्यासाठी नेहमीच आदरणीय आहेत आणि राहतील. तुमच्या हातात असेल तर मला आता अटक करा, असे म्हणत आपण  राज्यपालांवर मी टीका केली नसल्याचे राऊत म्हणालेत. एवढेच नाही तर  कधी काळी नरेंद्र मोदी शरद पवारांसाठी काम करत होते याची आठवण देखील राऊतांनी चंद्रकांत पाटील यांना करून दिली. शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेनेची आघाडी आहे. चंद्रकांत दादांनी त्याची चिंता करू नये. सरकार पडत नाही आणि पडणारही नाही असे राऊतांनी ठणकावून सांगितले. सगळ्यात महत्वाचे म्हणजे संजय राऊत यांच्या दंडात ताकद आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. त्याला देखील राऊतांनी उत्तर दिले असून, शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला. तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणता का? इतिहास समजून घ्या. आमच्या दंडाशी बरोबरी करू नका. आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो असे राऊत म्हणालेत.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यावरून वाद
चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही हे भाकीत करण्यासाठी मी काही उद्धव ठाकरेंसारखा डॉक्टर नाही आणि संजय राऊतांसारखा कंपाउंडर नाही. तिसरी लाट येऊ शकते का नाही हे माहीत नाही. पण कोव्हीड फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी बोलतो माझ्याशी बोलत नाही अशी टीका केली होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here