मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी नांदगावकर म्हणाले, राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी महाराष्ट्र सुरक्षित आहे. कोणाच्या केसालाही धक्का लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
काय म्हणाले राऊत ?
शिवसेना भवनात असे धमक्यांचे पत्र रोज येतात. महाराष्ट्र सुरक्षित आहे. महाराष्ट्रात कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. लागत असेल तर केंद्रीय सरकार CISF ची सुरक्षा द्यायला समर्थ आहे. ही स्टंटबाजी सोडून द्या. कोणत्याही व्यक्तीच्या जीवाला धोका असेल तर येथील सरकार तुमच्या सुरक्षेसाठी जबाबदार आहे, असे राऊत म्हणाले.
राजद्रोह कलमाबाबत दिलेल्या निर्णयाचे स्वागत
माध्यमांशी बोलताना राऊतांनी न्यायालयाने राजद्रोह कलमाबाबत दिलेल्या निर्णयाचे स्वागत देखील केले. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोहाच्या खटल्याबाबत महत्वाचा निकाल दिला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. पंतप्रधानांना आता कुठंतरी वाटलं की, या कायद्याचा गैरवापर होते. याचा वापर असा सुरू राहिला तर नागरिकांचा असंतोष उफाळून येईल, असं वाटलं असेल. त्यामुळे सरकार पुनर्विचार करण्यास तयार आहे. यासह पुढे राऊत असेही म्हणाले की, भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती येऊ नये यासाठी देशाच्या समस्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे. देशाची अर्थव्यवस्था अत्यंत खालावली आहे. तुम्ही किती दिवसांपर्यंत लोकांना भ्रमात ठेवणार आहात?, असे मत देखील व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community