अनिल देशमुख आणि प्रताप सरनाईक यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र बसून तोडगा काढतील, अशी अशा आहे. मात्र असे आरोप भाजपवाल्यांवरही झाले होते, ते काय धुतल्या तांदळाचे आहेत का? ते हरीशचंद्रांचे अवतार आणि बाकीचे हरामखोर आहेत का, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला.
… हे भाजपचे अपयश!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राजकीय संन्यास घ्यावासा वाटणे, हे भाजपचे अपयश आहे. हे दुर्दैवी आहे. त्यांनी राज्याच्या विकासासाठी सरकारच्या खांद्याला खांदा लावून काम केले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
(हेही वाचा : शिखांमध्ये पसरतोय’ लव्ह जिहाद’! खलिस्तानींच्या आडून भारतीय शीख लक्ष्य!)
मुख्यमंत्र्यांसाठी मोदी ‘नरेंद्रभाई’!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत गेले आणि राज्याच्या विषयावर चर्चा केल्यावर एकांतात दोघांची चर्चा झाली. त्यातून काही वेगळा अर्थ काढू नका. राजकीय चर्चा आणि व्यक्तीगत नातेसंबंध या दोन्ही गोष्टी भिन्न असतात. उद्धव ठाकरे यांच्यासाठी पंतप्रधान मोदी हे ‘नरेंद्रभाई’च आहेत, असेही राऊत म्हणाले.
परीक्षा आणि पेपर सेट झाला!
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. निवडणूक कधीही झाली तर महाविकास आघाडीचाच उमेदवार जिंकेल असा दावा करत पण तो उमेदवार काँग्रेसचा असेल का? याबाबत मात्र राऊत काही बोलले नाहीत. इतकेच नाही तर जेव्हा आम्हाला परीक्षा द्यायची तेव्हा देऊ. परीक्षा आणि पेपर सेट झाला आहे. कुणाचे काय फुटेल ते पहा, अशा शब्दात भाजपच्या सत्ताबदलाच्या दाव्यावर राऊतांनी जोरदार निशाणा साधला.
महविकास आघाडीचे व्यवस्थित सुरु!
शरद पवार नाराज या चर्चेला अर्थ नाही. तिन्ही पक्षांचे व्यवस्थित सुरु आहे. केव्हातरी पूर्णविराम द्यावा लागेल. सरकारची दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मनुष्य म्हटल्यावर मतभेद असू शकतात, पण नाराज कुणीच नाही, असे राऊत यांनी आवर्जुन सांगितले.
(हेही वाचा : उत्तर प्रदेशातील धर्मांतराचे बीड कनेक्शन!)
Join Our WhatsApp Community