शिवसेना आमदारांना रिट्रीट, तर भाजप आमदारांना ताज! राज्यसभेसाठी ‘हॉटेल मॅनेजमेंट’

79

10 जून रोजी होणा-या राज्यसभा निवडणुकीत कोणताही घोडेबाजार होऊ नये यासाठी शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी खबरदारी घेतली आहे. राज्यसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी या दोन्ही पक्षांना प्रत्येक मत महत्वाचं आहे. त्यामुळे यात दगाफटका होऊ नये म्हणून दोन्ही पक्षांनी व्यूहरचना आखली आहे. त्यामुळेच शिवसेनेने आपल्या सर्व आणदारांना हॉटेल रिट्रीट येथे रवाना केले आहे. तर भाजपने आपल्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये धाडल्याचे समजत आहे.

शिवसेना आमदार हॉटेलकडे रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या सर्व आमदारांची सोमवारी संध्याकाळी बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना विश्वास दिला आहे. त्यानंतर या सर्व आमदारांना बसमधून मालाडच्या रिट्रीट हॉटेलकडे रवाना करण्यात आले आहे. तसेच या हॉटेलच्या बाहेरही शिवसैनिकांची या आमदारांवर नजर असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः राज्यसभा निवडणूक : कोरोनाबाधित आमदार मतदान करणार का? राज्य निवडणूक आयोगाचे केंद्राला पत्र)

भाजपच्या आमदारांना ताज

त्याचबरोबर भाजपलाही घोडेबाजाराची भीती असल्याने भाजपनेही आपल्या आमदारांना मुंबईतील ताज हॉटेलमध्ये धाडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यसभा निवडणूक ही चुरशीची होणार आहे, त्यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.