शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारीला विधीमंडळात त्यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका करत हा राजकीय कार्यक्रम असल्याचे ते म्हणाले. यावर आता शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी राऊतांना प्रतिउत्तर दिले आहे.
( हेही वाचा : सर्वसामान्यांना बसणार शॉक! वीजबिलात होणार तब्बल ५० रुपयांची वाढ)
काय म्हणाले दीपक केसरकर?
काश्मिरमधील ३७० कलम हटवणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते आणि त्याच कलम ३७० चा पुरस्कार करणाऱ्या कॉंग्रेसला जाऊन शिवसेनेच्या लोकांनी भेटणं हा बाळासाहेबांचा घोर अपमान आहे. आम्ही अनेक ठिकाणी भेट दिल्यावर काहीजण गोमुत्र टाकून जमीन साफ करतात, अगदी त्याचप्रमाणे काही लोकांचं शुद्धीकरण करायला पाहिजे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत आता संजय राऊत भारत जोडोमध्ये जात आहेत. त्यामुळे मला एक दिवस पंतप्रधान करा मी काश्मिरमधील ३७० कलम हटवून दाखवेन असे म्हणणारे बाळासाहेब कुठे आणि सत्तेसाठी कॉंग्रेसच्या मागे धावणारे, स्वत:ला शिवसैनिक म्हणणारे कुठे हा खरा प्रश्न आहे अशी खोचक टीका दीपक केसरकरांनी संजय राऊतांवर केली आहे.
Join Our WhatsApp Community