शिंदे गटाकडून पक्षाच्या तीन नावांचा पर्याय, निवडणूक आयोग काय घेणार निर्णय?

157
शिंदे गटाने त्यांच्या पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे तीन नावांचा पर्याय दिला आहे. तिन्ही नावांमध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना हे मुख्य नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पर्यायी नावांचा प्रस्ताव सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला १ वाजेपर्यंत मुदत दिली होती.

कोणत्या गटाने कोणती चिन्हे मागितली?

निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला आहे. त्यामुळे  शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोग रद्द करण्याची अधिक शक्यता आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर दोन्ही गटांमध्ये आमचाच गट बाळासाहेबांची शिवसेना आहे, असा दावा करू लागले. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले आहे. आता निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ठाकरे आणि शिंदे गटात डाव-प्रतिडाव रचला जात आहे. ठाकरे गटाने पर्यायी तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय दिला आहे. तर, शिंदे गटानेदेखील उगवता सूर्य आणि त्रिशुळ या चिन्हांचा पर्याय दिला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.