विनाकारण त्रासापासून मुक्त होण्यासाठी सेना सरनाईकांच्या पाठिशी! संजय राऊतांचा विश्वास 

आम्हाला तुम्ही किती त्रास देणार, फारतर तुरुंगात टाकाल, तुरुंगातही जायला आम्ही तयार आहोत. आम्ही महाभारतातील योद्धे आहोत आणि माझे नाव संजय आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

82

प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या पत्रात त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून दिला जाणाऱ्या विनाकारण त्रासाचा उल्लेख केला आहे. त्यांना होत असलेल्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

विनाकारण त्रास तृणमूललाही दिला! 

भाजपच्या माध्यमातून केंद्रीय तपास यंत्रणा विनाकारण त्रास देत आहेत त्यामुळे या त्रासापासून मुक्त होण्यासाठी मोदींशी जुळवून घ्या, असे सरनाईक यांनी म्हटले आहे. या विनाकारण होत असलेल्या त्रासापासून मुक्तता कशी मिळवायची याकरता सेना  सरनाईक यांच्या पाठिशी आहे. हा विनाकारण त्रास पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला झाला, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना झाला. सत्ता गेली म्हणून विनाकारण त्रास द्यायचा हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही, असेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा : कोरोनात योग आशेचा किरण ठरला! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास )

आम्ही तुरुंगातही जायला तयार! 

आम्ही वाघाच्या काळजाचे आहोत आमचे शरीर वाघाचे आणि हृदय उंदीराचे नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिलेदार आहोत, तुम्ही आम्हाला किती त्रास देणार, फारतर तुरुंगात टाकाल, तुरुंगातही आम्ही जायला तयार आहोत. आम्ही महाभारतातील योद्धे आहोत आणि माझे नाव संजय आहे. आंतरराष्ट्रीय दिनानिमित्ताने भाजपाला आपण शवासनाच्या शुभेच्छा आहेत, असेही संजय राऊत म्हणाले.

राज्यातील महाआघाडीचे सरकार आदर्श उदाहरण! 

राज्यात तिन्ही पक्षांचे नेते घट्ट नात्यांत जुळलेले आहेत. त्यांची एकमेकांना कमिटमेंट आहे. किमान सामान कार्यक्रमावर महाआघाडीची स्थापना झाली आहे. सर्व जण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी आहेत. हे सरकार ५ वर्षे पूर्ण करील. तिन्ही पक्षांचा उत्तम समन्वय आहे, आघाडीचे सरकार कसे चालवायचे हे उत्तम उदाहरण आहे. यामुळेच विरोधी पक्षाला नैराश्याने घेरले आहे, शिवसेनेत कोणताही गट नाही. शिवसेनेत एकच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच गट आहे, असेही राऊत म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.