शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. शनिवारी, ८ ऑक्टोबरला रात्री याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीच्या आधीच उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटालाही धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. किंबहुना शिवसेना पक्षाचे नावदेखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला पर्याय देणे बंधनकारक आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निर्णय
खरी शिवसेना कुणाची, याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू होती. आयोगाने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाला कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची कागदपत्रे तपासल्यानंतर शनिवारी जवळपास चार तास बैठक झाली. त्यानंतर चिन्ह गोठविण्याचा निर्णय घेतला. अंधेरी पूर्व पोट निवडणुकीच्या आधी चिन्हावर निर्णय घ्यावा, अशी मागणी शिंदे गटाने केली होती.
(हेही वाचा राहुल गांधींनी पुन्हा ओकली गरळ, वीर सावरकरांचा अवमान, उद्धव ठाकरे निषेध करणार का, फडणवीसांचा सवाल!)
निर्णय काय झाला?
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, शिवसेनेच्या दोन्ही गटांना ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. मात्र, दोन्ही गट शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना ( शिंदे गट) अशी नावे वापरू शकतात. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटाला वेगळे चिन्ह देण्यात येईल, असेही निवडणूक आयोगायाने स्पष्ट केले आहे.
Join Our WhatsApp Community