शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यांचे कौतुक करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी त्या महिला कार्यकर्त्याना मातोश्रीमध्ये बोलावून घेतले. तेव्हा मात्र त्यांचा अपमान झाला, त्यामुळे या महिला कार्यकर्त्या आता शिंदे गटात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत.
या महिला कार्यकर्त्यांनी मातोश्रीत येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आम्ही आंदोलन करतो, भाजप तसेच शिंदे गटाच्या नेत्यांना अंगावर घेतो. मात्र पद देण्याची वेळ येते तेव्हा आम्हाला दूर ठेवले जाते अशी खंत बोलून दाखवली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आंदोलन करताना स्वतःची काळजी घ्या. तसेच शिवसेनेशी (Shivsena) एकनिष्ठ राहणाऱ्या महिलांचा भविष्यात नक्की विचार केला जाईल, असे आश्वासनही दिले.
(हेही वाचा १९८४ च्या शीखविरोधी दंगलप्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार Sajjan Kumar यांना जन्मठेपेची शिक्षा)
मात्र त्यानंतर उपनेत्या विशाखा राऊत यांनी मात्र या महिला कार्यकर्त्यांचा अपमान केला. तुम्हाला पद कसे मिळते तेच बघते, कुठल्या कोपऱ्यात पडून राहाल ते कळणारही नाही, अशा शब्दात विशाखा राऊत यांनी या महिलांचा अपमान केला असल्याची माहिती समोर आली आहे. विशाखा राऊत यांच्याकडेच महिला आघाडीतील पद वाटपाची जबाबदारी आहे. ही घटना घडल्यानंतर पुण्यातून आलेल्या या महिलांचा चांगलाच हिरमोड झाला. ठाकरे गटासाठी एवढे आंदोलन केले मात्र, पदरी आला तो अपमान. म्हणून आता या महिला शिवसेना (Shivsena) शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
Join Our WhatsApp Community