उबाठा (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विश्व हिंदू परिषदेला (Vishwa Hindu Parishad) थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. राम मंदिर उडवून देण्याची धमकी (Threat) देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी मुसलमान नावे घेतली होती, असा आरोप राऊत यांनी केला. (Sanjay Raut)
धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायचं
राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, “हे जे तरुण होते ते मला माहिती आहे. आमच्याकडे सगळी माहिती आहे. राम मंदिर उडवून द्यायची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते त्यांनी मुसलमान नावे घेतली होती. या देशामध्ये लोकसभा निवडणुकीआधी अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायचं, हे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे,” अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. (Sanjay Raut)
(हेही वाचा : Uddhav Thackeray : ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर घातपात करण्याचा धमकीचा कंट्रोल रूम ला फोन, मुंबई पोलीस सतर्क)
ही संघनीती आहे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. “राम मंदिराच्या संदर्भात शिवसेनेचे योगदान काय आहे, हे या जगातला प्रत्येक हिंदू जाणतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस नव्हते. गोधडीमध्ये होते सगळे. गोधडीमध्ये रांगत होते. काय सांगतात ते राम मंदिरावर आणि तुम्ही काय प्रश्न विचारता राम मंदिरावर आम्हाला? त्यांना विचारा प्रश्न, तुम्ही कुठे होतात म्हणून. पळून गेले हे लोक. मैदान सोडून पळून जाणाऱ्या लोकांनी आणि या पळकुट्यांनी शिवसेनेच्या राम मंदिरातील योगदानावरती प्रश्न विचारावे ही संघनीती आहे. स्वतःची नामर्दानगी लपवायची आणि दुसऱ्याच्या शौर्यावरती बोट दाखवायचं. हा रामाचा अपमान करतआहेत ते, असा आरोप तत्यांनी केला.
ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची
ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची महाराष्ट्रामध्ये सरकार आहे त्यांची नाही ते सूडाने पेटलेले सरकार आहे पेटलेल्या सरकार ही जबाबदारी केंद्र सरकारची ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबाचं संरक्षण शिवसेना नेत्यांचा संरक्षण काढून घेतलेला आहे त्याच्यामुळे सगळे जबाबदारी उद्या भविष्यात काय घडलं तरी या केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची आहे.