उबाठा शिवसेनेचे (Shivsena UBT) आमदार सुनील राऊत हे प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याची करत असलेली थट्टा एका बाजुला तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मुंबईतील माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह पक्षातील विभागप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी या महाकुंभमेळ्यात डुबकी मारली. या ठिकाणी धुतलेली पापे आपल्या अंगाला चिकटू नये म्हणून डुबकी मारली नाही. याठिकाणी अजिबात जावू नका असे सुनील राऊत यांनी आवाहन केले होते. आता त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुनील राऊत यांनी आवाहन केल्यानंतरही किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेकांनी महाकुंभात स्नान केल्याने त्यांच्या अंगाला किती पापे चिकटली, असा खोचक सवाल उपस्थित केला जात आहे.
सुनील राऊत काय म्हणाले होते?
पूर्व उपनगरातील विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील एका मिसळ महोत्सवात बोलतांना उबाठा शिवसेनेचे (Shivsena UBT) आमदार सुनील राऊत यांनी जाहीरपणे महाकुंभात स्थान केल्याने इतरांची पापे आपल्या अंगाला चिकटतील असे विधान करत याठिकाणी स्थान करणाऱ्या श्रध्दाळू भाविकांची थट्टाच उडवली. या कार्यक्रमांत बोलतांना त्यांची जिभ त्यांचे बंधू संजय राऊत यांच्याप्रमाणे जास्तच घसरली. ते म्हणाले, मी प्रयागराजला गेलो होतो, दोन दिवस तिथली मजा घेत होतो. कुणी किती पाप धुतली ते पाहत होतो. त्यांची ती धुतलेली पापे आपल्या अंगाला चिकटतील की काय म्हणून डुबकी मारली नाही. त्यांची ती पापे चिकटण्यापेक्षा आपण आहोत ते बरे आहोत. निष्ठावंत आणि निस्वच्छ. आणि ज्याप्रकारे उध्दवजींवर निष्ठा आणि शिवसेनेवर असणाऱ्या निष्ठेने आपण काम करतोय, त्यानिष्ठेला कुठे गालबोट लागू नये, म्हणून मी प्रामाणिकपणे तिथे गेलो, पण पाहून आलो इव्हेंट. परंतु माझी प्रामाणिक इचछा आहे की तिथे कुणी जावू नका. अजिबात जावू नका. काही नाही तिथे. सगळीकडे बेकार परिस्थिती आहे. म्हणून मी लोकांना सांगतो, तिथे जावू नका, आपली पापे धुण्यासाठी उध्दवजींवर विश्वास ठेवा.
(हेही वाचा नायर रुग्णालयातच Clean-up Marshals कडून रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची लूट)
उबाठाच्या कोणत्या पदाधिकाऱ्यांनी केले अमृत स्नान?
सुनील राऊत यांनी महाकुंभातील भाविकांच्या स्नानाची थट्टा उडवल्यानंतर दहिसर, बोरीवली आणि कांदिवली विधानसभेचे उबाठा शिवसेनेचे (Shivsena UBT) विभागप्रमुख उदेश पाटेकर आणि माजी नगरसेविका सुजाता पाटेकर यांनी आपल्या कुटुंबासह महाकुंभात पवित्र अमृत स्नान केले. त्यानंतर मुंबईच्या माजी महापौर आणि उबाठा शिवसेनेच्या (Shivsena UBT) प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनीही या महाकुंभात स्नान केले. त्यामुळे सुनील राऊत एका बाजुला महाकुंभातील अमृत स्नानाची थट्टा उडवत असतानाच त्यांच्याच पक्षाचे नेते आणि पदाधिकारी तिथे जावून अमृत स्नान करत असल्याने आता त्यांच्या अंगाला चिकटलेली पापे ही सुनील राऊत यांना चालतील का असा सवाल काहींकडून उपस्थित केला जात आहे.
जर महाकुंभात सहभागी व्हायचे नव्हते, तर प्रयागला का गेलात, असा सवाल करत काहींनी सुनील राऊत यांना कुणी तिथे भिक घातली नसेल म्हणून संतापून ते असे बोलत असतील, असे काही म्हणत असतील. जर त्यांना सन्मान दिला असता तर त्यांनी स्तुती केली असती, पण कुणी विचारलेच नाही म्हणून त्यांना अंगाला पापे चिकटण्याची भीती वाटू लागली, असेही काहींचे म्हणणे आहे. संजय राऊतांनी उबाठा शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधल्यामुळे त्यांच्या बंधूलाही काँग्रेसच्या मिठाला जागावे लागते असेही काहींचे म्हणणे आहे. पेडणेकर आणि पाटेकर यांच्यासह ज्या पदाधिकाऱ्यांनी महाकुंभात अमृत स्नान केले ते निष्ठावंत नाहीत का? त्यांची उध्दव ठाकरेंवर निष्ठा नाही का, असाही सवाल केला जात आहे.
Join Our WhatsApp Community