मुंब्र्यात आज हाय व्होल्टेज ड्रामा दिसला. गेल्या आठवड्यात मुंब्र्यातील ठाकरे गटाची शाखा बुलडोझर लावून तोडण्यात आली होती. या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे मुंब्र्याच्या दौऱ्यावर आले. त्यावेळी शाखेच्या बाहेर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी (Shivsena) घेराव घालून बसले होते. अशा वेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आले होते. मात्र प्रत्यक्ष जेव्हा उद्धव ठाकरे यांची गाडी शाखेच्या जवळ आली. मात्र पोलिसांनी शाखेच्या समोर बॅरिकेट्स लावले होते, ते अखेरपर्यंत काढले नाहीत, त्यामुळे अखेर उद्धव ठाकरे यांना शाखेजवळ न जाताच माघारी फिरावे लागले.
(हेही वाचा Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा मुंब्रा दौरा; जमाव बंदीचा आदेश; दौरा स्थगित करण्याची विनंती)
उद्धव ठाकरे मुंब्र्यात येत असताना त्यांचे जेसीबीच्या आधारे पुष्पवृष्टी करण्यात आली होती, त्यांचे स्वागत करण्यात आले, मात्र ज्या शाखेच्या पाहणीसाठी ते येणार होते, तिथे मात्र शिंदे गटाचे शिवसैनिक जमले होते, कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना शाखेची पाहणी करू देणार नाही, असा निश्चय शिंदे गटाने घेतला होता. पोलिसांनीही बॅरिकेट्स लावून शाखेच्या बाजूने रस्ता बंद केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना शाखेजवळ जाऊ दिले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना शाखेची पाहणी न करताच परत फिरावे लागले. यावेळी शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी (Shivsena) उद्धव ठाकरे यांना काळे झेंडे दाखवले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना या शाखेच्या ठिकाणी उभारलेला कंटेनर काढा, अशी मागणी केली.
Join Our WhatsApp Community