शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा बुधवारी 27 जुलैला सामनामधील मुलाखतीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. भाजपवाल्यांनो, सावधान.. उद्या हे महाशय स्वत: ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा सांगतील. शेवटी लालसा, अशी घाणेरडी असते ना! ही चटक आहे, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर टीका केली आहे.
( हेही वाचा: रस्त्यांच्या छोट्या निविदा न काढता शहर व उपनगरासाठी स्वतंत्र कंत्राट द्यावी: भाजपची मागणी )
आधी भाजपवर आरोप करत होते
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्री झालो तर प्राॅब्लेम काय तुम्हाला? तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता, त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरुन खाली उतरवाल? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काॅंग्रेस -राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पाहा. भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरत आहे. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय- अत्याचार करतो ही ती क्लिप आहे. माझ्यासमोर त्यांनी राजीनामा दिला. मी तेव्हा म्हणालो होतो की संयम ठेवा. जेव्हा भाजपसोबत सत्तेत होतो तेव्हा भाजप त्रास देतयं म्हणून बोंब आणि आता त्यांच्यासोबतच गेले. गावागावात भाजप शिवसेनेला काम करु देत नाही. भाजप शिवसेनेला संपवत आहे असा यांचा आक्षेप होता, असे ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community