आता उद्धव ठाकरे कुणाचीही पक्षातून हकालपट्टी करू शकणार नाही

109

उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीपासून संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांची जबाबदारी काय असणार, ते पक्षात काय काम करणार, यावर चर्चा सुरु झाली आहे. पक्षाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे एक सामान्य शिवसैनिक बनले आहेत. त्यांच्याकडील पक्षप्रमुख पदाचे अधिकार राहिले नसल्याने सर्वात महत्वाचे म्हणजे आजपासून पक्षात कुणी बंडखोरी किंवा पक्ष शिस्तीचा भंग केला, तरी संबंधित पदाधिकाऱ्याची उद्धव ठाकरे हकालपट्टी करू शकणार नाही. 

पक्षप्रमुख पदाची निवडणूक घेण्यासाठी परवानगी मागितलेली  सध्या शिवसेना पक्ष कुणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यावरील सुनावणी आयोगाने ३० जानेवारीपर्यंत स्थगित केली आहे. तोवर दोन्ही बाजूच्या वकिलांना त्यांचे त्यांचे म्हणणे लेखी कळण्याचा आदेश आयोगाने दिला आहे. मात्र त्या दरम्यान उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपुष्टात आला आहे. २३ जानेवारी २०१८ रोजी उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुखपदी निवड झाली होती. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला पक्षप्रमुख पदासाठी निवडणूक घेण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती, मात्र आयोगाने त्यावर प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षांतर्गत कोणत्या जबाबदाऱ्यांपासून मुक्त रहावे लागणार यावर आता चर्चा सुरु झाली आहे. 

(हेही वाचा उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीबाबत केले मोठे विधान;…एकत्र येण्याचे नाटक करू नका)

पक्षाच्या घटनेनुसार पक्षप्रमुखाच्या काय आहेत जबाबदाऱ्या? 

  • राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेणे आणि पदाधिकाऱ्यांना कामे वाटून देणे.
  • मानद पदाधिकाऱ्यांची निवड करणे.
  • पक्षाचा ठरवलेले कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी मार्गदर्शन करणे.
  • सर्व प्रक्रारच्या सार्वजनिक निवडणुकीत उमेदवारांची यादी निश्चित करणे.
  • पक्षाच्या कोणत्याही पदावरील सदस्य अथवा सदस्याची पक्षातून हकालपट्टी करू शकतात

आता उद्धव ठाकरे उपरोक्त कोणत्याही अधिकाराचा वापर करू शकणार नाही. यात उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना जबाबदारी वाटू शकणार नाही, अथवा कुणाची निवड करू शकणार नाही वा कोणत्या निवडणुकीत उमेदवाराची यादी निश्चित करू शकणार नाही. अशी परिस्थिती किती दिवस राहणार हे आता निवडणूक आयोगाच्या हाती असणार आहे. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.