मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 14 मे रोजी सभा होणार आहे. पण या सभेच्या टीझरवरुन आता मनसे आणि शिवसेनेत नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेकडून या तयार करण्यात आलेल्या सभेच्या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील गर्दीची दृश्ये असल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे हिंदुत्व नकली असल्याचा टोलाही काळे यांनी लगावला आहे.
शिवसंपर्क अभियान या नावाने शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या 14 मे च्या सभेचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. या ट्वीटमध्ये राज ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेतील दृश्ये वापरण्यात आल्याचा आरोप गजानन काळे यांनी केला आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
गजानन काळे यांचे ट्वीट
असली नकली म्हणणाऱ्यांनी स्वतः चे आत्मपरीक्षण करा, काहीतरी अस्सल तुमचे असूद्या.
इतके ही नकली होऊ नका.
सभा शिवसेनेची आणि व्हिडिओमध्ये गर्दी मनसेच्या सभेची. अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का? लक्षात आल्यावर ट्वीट डिलिट करण्याची नामुष्की नकली हिंदुत्ववादी, असे ट्वीट गजानन काळे यांनी केले आहे.
असली नकली म्हणाऱ्यानी स्वतः चे आत्मपरीक्षण करा..काहीतरी अस्सल तुमचे असुद्या.
इतके ही नकली होऊ नका.
सभा शिवसेनेची आणि व्हिडिओ मध्ये गर्दी मनसेच्या सभेची…अजून माणसं जमा करायला राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतो का ..? लक्षात आल्यावर ट्विट डिलिट करण्याची नामुष्की…नकली हिंदुत्ववादी pic.twitter.com/LVKtoq7e6t— Gajanan Kale (@MeGajananKale) May 11, 2022
ही चूक लक्षात आल्यानंतर शिवसेनेने हा टिझर ट्विटरवरुन डिलिट केल्याचा दावाही काळे यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community