मविआत ‘वंचित’ची जबाबदारी शिवसेनेचीच; अजित पवार यांनी केले स्पष्ट

103

सध्या प्रकाश आंबेडकर हे दोन्ही दगडावर पाय ठेवून आहेत, कालपर्यंत ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला घेण्यासाठी चर्चा करत होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा वंचितला विरोध आहे. बराच दिवस झाला म्हणून निर्णय घेतला नाही, त्यामुळे अखेर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि वंचितला युतीमध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी केली. प्रकाश आंबेडकर यांनी अचानक दिशा बदलून त्यांनी उद्धव ठाकरे यांनी थेट ‘आमच्याविषयी लवकर निर्णय घ्या’ असे म्हटले. आता मविआतील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वंचितला सामावून घेण्यात येईल, असे म्हटले; पण त्यांनी अफलातून फॉर्म्युला सांगितला आहे, तो जर शिवसेनेला मान्य झाला तरच वंचित मविआसाठी संचित बनू शकणार आहे.

काय म्हणाले अजित पवार? 

या विषयावर राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फॉर्म्युला सुचवला आहे. शिवसेना आपल्या कोट्यातून वंचितला सामावून घेऊ शकते, असा पर्याय सुचवला आहे. आता त्यांना वरिष्ठांनी काही सांगितले असेल तर त्याबद्दल मला काही माहिती नाही. आमची महाविकास आघाडी असली तर काही लोक आमच्यासोबत येण्यासाठी चर्चा करण्यासाठी येतात. काही लोक हे त्या त्या पक्षाच्या कोट्यातून निर्णय घेतात. काँग्रेसला जर निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांच्या कोटातून निर्णय घ्यावा. शिवसेनेला जो कोटा दिला आहे, त्यांच्या कोट्यातून त्यांनी मित्र पक्षाला सामावून घ्यावे. राष्ट्रवादीने आपल्या मित्रपक्षाला आपल्या कोट्यात सामावून घ्यावे, असे केले तर अडचणी येणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.

(हेही वाचा चित्रा वाघ यांचा उर्फीला विरोध; टार्गेट मात्र रुपाली चाकणकर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.