भूषण देसाईंच्या शिवसेना प्रवेशानंतर सुभाष देसाई काय म्हणाले?

126
उद्धव ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटामधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर या प्रकरणी सुभाष देसाई यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या मुलाच्या पक्षप्रवेशावर सुभाष देसाई म्हणाले की, माझा मुलगा भूषण देसाई याने शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या  कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. शिवसेना, वंदनीय  बाळासाहेब, उद्धव ठाकरे व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढे सुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे, अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.