‘#ShivsenaCheatsMumbaikar’ का सुरु झालाय ट्विटर ट्रेंड?

155

शिवसेनेला येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव होण्याची भीती सतावू लागली आहे, म्हणून सेनेने प्रभागांची फेररचना करण्याचा घाट घातला आहे, असे सांगत आता शिवसेनेच्या विरोधात ट्विटरवर जोरदार ट्रेंड सुरु झाला आहे. #ShivsenaCheatsMumbaikar या नावाने हा ट्रेंड सुरु झाला असून यामध्ये सेनेची पोलखोल करणे सुरु झाले आहे.

निवडणूक आयोगाने स्थगिती आणावी

भाजपचे नेते मिहीर कोटेचा यांनी यामागील कारणे देत ट्विट केले आहे की, महापालिका निवडणुकीत पराभव दिसत असल्याने शिवसेना परस्पर थेट प्रभागांची रचना बदलत आहे. यात इकबाल सिंग चहल यांचाही सहभाग आहे. हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, महाराष्ट्र निवडणूक आयोगाला विनंती आहे की, त्यांनी यावर स्थगिती आणावी.

(हेही वाचा : मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध! पुरावे शरद पवारांनाही देणार)

सेनेकडून सत्तेचा दुरुपयोग

तर भाजपचे नेते मोहित भारती यांनीही सेनेवर आरोप करत ‘सत्ताधारी शिवसेना हे ‘नवाबी भंगार’ स्टाईलने सत्तेचा दुरुपयोग करत प्रभागांची रचना बदलत आहे. पुढील पाच वर्षे मुंबईत वसुली करण्यासाठी हा खटाटोप सुरु आहे.

सेनेला पराभवाची चाहूल

या प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही उडी घेत म्हटले आहे की, जेव्हा मुंबई महापालिकेतून कर्तव्यनिष्ठ अधिकारी अश्विनी भिडे यांच्या सारख्या अधिकाऱ्याची बदली केली जाते, तेव्हाच स्पष्ट झाले होते की, शिवसेना महापालिका निवडणूक २०२२ यामध्ये पराजीत होणार आहे. जे सचिन वाझे करत होता, ते भिडे आणि वानखेडे करणार नाहीत’, असे ट्विट केले आहे.

… तर मुंबईचे पश्चिम बंगाल होणार!

अंकित जैन या सामाजिक कार्यकर्त्यानेही सेनेच्या या कृत्याचा विरोध करत जर तुम्हाला मुंबई पश्चिम बंगाल होण्यापासून वाचवायचे असेल, तर कृपया निवडणूक आयोगाला पत्र लिहून शिवसेना प्रभागाच्या रचनेत बदल करण्यासाठी यंत्रणाचा गैरवापर करत आहे, त्याचा विरोध करा.

https://twitter.com/indiantweeter/status/1454451777605038081?s=20

(हेही वाचा : वाहनतळांची कंत्राटे महिला बचत गटांना, पण चालवतो कोण?)

सोन्याचे अंडे देणारी कोंबडी गमावण्याची भीती

पल्लवी म्हणतात की, शिवसेना महापालिका निवडणुकीत हरणार आणि सोन्याचे अंडे देणारी कोंबडी गमावणार, याची सेनेला भीती आहे का? म्हणून शिवसेना तिला अपेक्षित प्रभागांची फेररचना करत आहे का? महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रभागांच्या फेररचनेचा जो आराखडा तयार केलेला आणि महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या आराखड्यात इतका फरक कसा?, अशा प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.