शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी महापौर दालनातील बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उप महापौर अँड. सुहास वाडकर, सभागृह नेते विशाखा राऊत, स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) स्वप्निल टेंबवलकर, नगरसेविका सुजाता सानप, “डी” विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील (रिगल सिनेमा नजीक) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, नगरसेविका सुजाता सानप, “ऐ” विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवदास गुरव उपस्थित होते.
(हेही वाचा बाळासाहेब असते तर, मोदी, शहांवर…! काय म्हणाले संजय राऊत?)