नाशिकसह सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार; पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती

127
नाशिकसह सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार; पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती
नाशिकसह सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार; पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यामार्फत राज्यात नाशिकसह शिवनेरी, गोराई, बुलढाणा, औरंगाबाद आणि रामटेक अशा सहा ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय आणि शिवकालीन थीम पार्क उभारण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी बुधवारी येथे दिली. या सर्व कामांसाठी ४१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून एक वर्षभरात सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील पर्यटनाला चालना मिळावी आणि त्यातून रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी पर्यटन विभाग विविध उपक्रम राबवत आहे. राज्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अनुभवायचा असतो, हेच लक्षात घेवून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबाबत सर्व माहिती या शिवसृष्टीतून पर्यटक आणि शिवप्रेमींना मिळण्यास मदत होणार आहे. शिवसृष्टीच्या कामाबाबत जनतेच्या आलेल्या सूचनांनुसार या कामामध्ये बदल करण्यात येईल. तसेच विविध लोगो स्पर्धांचे आयोजनही करण्यात येईल. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या कामासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती लोढा यांनी दिली.

(हेही वाचा – नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर थीम पार्कसाठी १५ कोटींची तरतूद – मंगलप्रभात लोढा)

मुंबईतील गोराई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. आता त्या ठिकाणी २५ एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्ध कौशल्य आणि आरमार संदर्भात प्रेरणा देणारे संग्रहालय (वॉर म्युझियम) उभारले जाणार आहे. बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, औरंगाबाद येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालयासाठी प्रत्येकी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या शिवसृष्टी, उद्यान आणि म्युझियम, थीम पार्कच्या माध्यमातून पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तसेच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास अनुभवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.